रस्त्याच्या हक्काची खरेदी
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
समज : रस्त्याच्या हक्काच्या खरेदीची नोंद खरेदी घेणार याच्या सात-बारा ‘इतर हक्कात’ नोंदवावी.
कायदा: गाव नकाशात रस्त्याची नोंद खालील प्रकारे दर्शविण्यात आलेली असते.
- गाव नकाशात एका गावावरून दुसर्या गावास जाणारे रस्ते दोन भरीव रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट नसते.
- ग्रामीण गाडीमार्ग दोन तूटक रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकामध्ये पोटखराबा सदराखाली समाविष्ट असते आणि यांची रुंदी अंदाजे १६१/२ ते २१ फूट असते.
- पायमार्ग एक तूटक रेषेने दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकामध्ये पोटखराबा सदराखाली समाविष्ट असते. यांची रुंदी अंदाजे ८१/४ फूट असते.
खरेदी केलेल्या रस्त्याच्या क्षेत्राची नोंद कोणाच्या सात-बारा उतार्यावर आणि कोठे करावी याबाबत संभ्रम आढळतो. खरेदी केलेल्या रस्त्याची नोंद ज्याच्या शेतजमिनीतून रस्ता जात आहे त्या (खरेदी देणार) याच्या सात-बारा उतार्यावर ‘इतर हक्कात’ नोंदवावी. त्यामुळे यापुढे सदर जमीन खरेदी घेणार्यास त्याबाबत माहिती मिळेल व भविष्यातील वाद टाळले जातील.