इतर राज्यातील शेतकर्याची महाराष्ट्रात जमीन खरेदी
वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३.
समज : अन्य राज्यातील शेतकरी महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकत नाही.
कायदा: अन्य राज्यातील शेतकरी महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकतो. त्याने सादर केलेला शेतकरी पुरावा, पत्रासह तहसिलदार कार्यालयात पाठवावा. तहसिलदारने असा पुरावा संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्राद्वारे संपर्क साधून या पुराव्याच्या खरेपणाबाबत दाखला मागवावा. असा दाखला प्राप्त होईपर्यंत संबंधीत फेरफार नोंद, तसा शेरा लिहून नोंद प्रलंबित ठेवावी.