जमीन संपादन झालेल्या व्यक्तीच्या वारसाने शेतजमीन खरेदी करणे
वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३.
समज : एका खातेदाराची शेतजमीन सार्वजनिक कामासाठी संपादित झाली होती. सदर खातेदार मयत झाल्यानंतर, शेतजमीन नावावर नसल्यामुळे त्याच्या मुलाला शेतजमीन खरेदी करता येणार नाही.
कायदा: एखाद्या व्यक्तीची जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित झाली असेल तर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३ अन्वये त्याला, अशा संपादनासाठी त्याच्या जमिनीचा कब्जा घेतल्याच्या तारखेपासून १० वर्षेपर्यंत ती व्यक्ती शेतकरी असल्याचे मानण्यात येते.
या कलमात दिनांक २७.५.२०१४ च्या शासन राजपत्रानुसार, उपरोक्त व्यक्तीच्या वारसांनाही शेतकरी असल्याचे मानण्यात यावे अशी सुधारणा केली आहे. त्यानुसार उपरोक्त मयत खातेदाराला संपादन अधिकार्याने दिलेला संपादन दाखला त्याच्या मुलाला शेतकरी पुरावा म्हणून सादर करता येईल.