वारसाहीन हिंदू विधवेला, पित्याकडून मिळालेली संपत्ती
वाचा : हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कलम १५(२)(अ) ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
समज : गावातील एक विधवा स्त्री खातेदार विनाआपत्य मयत झाली. तिच्या नावे असलेली मिळकत ही तिला तिच्या पित्याकडून वारसाने मिळालेली आहे. तिला तिच्या पतीच्या लहान भावाशिवाय जवळचे कोणीही वारस नाही. सदर मिळकतीत पतीच्या लहान भावाचे नाव वारस म्हणून दाखल करता येईल.
कायदा: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कलम १५(२)(अ) अन्वये ज्या हिंदू स्त्रिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने संपत्ती मिळालेली असते, अशी स्त्री मयत झाल्यास, तिची संपत्ती, त्या मृत स्त्रिच्या मुले/मुली (पूर्व मृत मुलगा/मुलगी किंवा त्याची अपत्ये यांसह) यांच्याकडे जाते. मृत स्त्री, विना आपत्य मरण पावल्यास तिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने मिळालेली संपत्ती तिच्या पित्याच्या वारसांकडे प्रक्रांत होते. अशी तरतुद आहे. त्यामुळे तिच्या मयत पतीच्या भावाचा वारसाधिकार असणार तिच्या संपत्तीला लागू होणार नाही.