अपंग वारसाच्या हिस्स्याबद्दल तक्रार
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २८ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
समज : एकत्र कुटुंबात मिळकतीच्या कायदेशीर वाटपात, कुटुंबातील एक सदस्य अपंग असल्यामुळे आणि या अपंग सदस्याचे पालन-पोषण कुटुंबातील इतर सदस्य तहयात करणार असल्याने त्याला मिळकतीत हिस्सा मिळण्याचा हक्क देण्याची आवश्यकता नाही.
कायदा: हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २८ अन्वये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याच्या कारणावरून अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीज करून अन्य कोणत्याही कारणावरून कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र असणार नाही अशी तरतुद आहे. त्यामुळे उपरोक्त धारणा चुकीची आहे.