खातेदाराचा खुन करणारा वारस
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २५ आणि २७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
समज : खातेदाराचा खुन करणार्या किंवा खातेदाराचा खून करण्यास अपप्रेरणा देणार्या व्यक्तीचा वारसाधिकार डावलता येणार नाही.
कायदा: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २५ आणि २७ अन्वये खालील तरतुदी आहेत.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २५ : जी व्यक्ती खातेदाराचा खून करेल किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती खून झालेल्या खातेदाराच्या संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरेल.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २७ : वाटपास अपात्र व्यक्ती जणू काही मयत आहे असे समजुन वाटप करण्यात यावे.
त्यामुळे खातेदाराचा खुन करणार्या किंवा खातेदाराचा खून करण्यास अपप्रेरणा देणार्या व्यक्तीस वारसाधिकार प्राप्त होणार नाही.