गर्भस्थ आपत्याच्या वारसाधिकार
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २० ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
समज : एकत्र कुटुंबातील एखादा खातेदार मृत्युपत्र न करता मयत झाला, त्यावेळेस त्याच्या मुलाची पत्नी (मयताची सुन) गर्भवती होती. तर सदर मयत खातेदाराच्या सुनेच्या गर्भात असलेल्या आपत्याला मयताच्या संपत्तीत हिस्सा मिळणार नाही.
कायदा: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २० अन्वये अकृतमृत्युपत्र खातेदाराच्या मृत्युसमयी जे अपत्य गर्भात होते व नंतर जिवंत जन्मले, त्याला किंवा तिला जणु काही अकृतमृत्यूपत्र व्यक्तिच्या मृत्यूपूर्वी जन्मले होते अशाच प्रकारे अकृतमृत्यूपत्र व्यक्तीचा वारस होण्याचा अधिकार असेल अशी तरतूद आहे.