महाराष्ट्र जमीन महसूल कार्यपध्दतीसाठी पुस्तके
महसूल खात्यात नव्याने नेमणूक झालेल्या अनेक अधिकारी/कर्मचार्यांकडून अनेकदा विचारणा होते की, महसूल कार्यपध्दती जाणून घेण्यासाठी नेमका कुठल्या पुस्तकांचा अभ्यास/वाचन करावे.
महसूल खात्यात राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करावे लागते आणि त्यासाठी चौफेर वाचन अत्यावश्यक आहे.
प्रत्येक कायद्याबाबत आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते. एका ठराविक पदावर पोहोचल्यानंतर, व्यस्ततेमुळे कायद्यातील तरतुदी पूर्णपणे वाचण्यास वेळ मिळत नाही. इतरांना विचारायलाही कमीपणा वाटतो.
हाताखाली काम करणारे लिपिक, तलाठी इत्यादी कर्मचारी यांना नेमणूक झाल्यानंतर विशेष प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांनी नेमणुकीनंतर लगेचच काम करायला सुरुवात केलेली असते. तरीही ते प्रामाणिकपणे आधीच्या कर्मचार्यांनी तयार केलेल्या जुन्या फाईल्स व टिपणी बघून त्याप्रमाणे त्यांच्याकडे सोपविलेल्या प्रकरणांवर काम करीत असतात. त्यामुळे जर आधीच्या कर्मचार्याने काही चुका केल्या असतील तर त्याच चुका हे नवीन कर्मचारी न कळतपणे पुढे चालू ठेवतात.
'शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांची कामे होत नाहीत' अशी तक्रार आपण नेहमीच ऐकतो. माझ्यामते या तक्रारीमागे दोनच कारणे असू शकतात.
(एक) संबंधित प्रकरणावर नेमकी काय कार्यवाही करावी याबाबतचे अज्ञान
(दोन) संबंधित प्रकरणात असणारी गैरवाजवी अपेक्षा
(तीन) आपण शासकीय नोकर/जनतेचे सेवक असल्याचा विसर पडणे
अर्थातच ही माझे वैयक्तीक मत आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
कायद्याच्या अभ्यासासाठी परिविक्षाधीन काळात बराच वेळ मोकळा असतो आणि त्या काळात केलेले वाचन फार महत्वाचे आणि कायम लक्षात राहणारे असते. परंतु अनेकदा परिविक्षाधीन काळात असे होतांना दिसत नाही. स्वतंत्र कार्यभार हाताळतांना याची उणीव जाणवते.
महसूल खात्यात नव्याने नेमणूक झालेल्या अनेक अधिकारी/कर्मचार्यांनी अभ्यास करावा अशा काही पुस्तकांची माहिती खाली दिलेली आहे. अर्थातच ती अपुरी आहे. प्रसंगानुरूप अनेक कायद्यांचा अभ्यास करावा लागतोच तथापि, महसूलची ओळख व्हावी या उद्देशाने सदर यादी दिलेली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये कलमे, अनुसूची, नियम आणि संकीर्ण असे चार भाग आहेत.
###भाग पहिला- कलमे
कलम या भागात एकूण १ ते ३३७ कलमे आहेत
###भाग दुसरा- नियम
नियम या भागात एकूण ३४ नियम असून ते खालील प्रमाणे.
- १. महाराष्ट्र जमीन महसूल (अनुसूचीत जमातीच्या भोगवटादारांनी अनधिकृतरित्या हस्तांतरीत केलेल्या) भोगवट्याची पुनर्स्थापनाबाबत नियम, १९३९
- २. महाराष्ट्र जमीन महसूल (अपीले, पुरीक्षण व पुनर्विलोकन) नियम, १९६७
- ३. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१
- ४. महाराष्ट्र जमीन महसूल शषतातील इमारत (उभारणे, नुतनीकरण करणे, पुनर्बांधणी करणे, फेरबदल करणे किंवा भर घालणे इ.) नियम, १९८९
- ५. महाराष्ट्र जमीन महसूल (कमी करणे, तहकूब करणे व सूट देणे) नियम, १९७०
- ६. महाराष्ट्र जमीन महसूल (खाते पुस्तिका तयार करणे, देणे व ठेवणे) नियम, १९७०
- ७. महाराष्ट्र जमीन महसूल (गौणखनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८
- ८. महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी चौकशी) नियम, १९६७
- ९. महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावरील निर्बंध) नियम, १९७८
- १०. महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम, १९६९
- ११. महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातींच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम, १९७५
- १२. महाराष्ट्र जमीन महसूल (झशडे इत्यादींच्या बाबतीतील अधिकारांचे नियमन करण्याबाबत) नियम, १९६७
- १३. महाराष्ट्र जमीन महसूल (दुमाला जमिनीचे नोंदणी पुस्तक) नियम, १९६७
- १४. महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७
- १५. महाराष्ट्र जमीन महसूल (नगर भू-मापन) नियम, १९६९
- १६. महाराष्ट्र जमीन महसूल (निस्तारपत्रक व मच्छीमारीचे नियमन) नियम, १९७३
- १७. महाराष्ट्र जमीन महसूल (पाणी वापरण्यासाठी परवानगी) नियम, १९६९
- १८. महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम, १९६७
- १९. महाराष्ट्र जमीन महसूल (भूमी अभिलेखांच्या प्रतींचे निरीक्षण, शोध व पुरवठा) नियम १९७०
- २०. महाराष्ट्र जमीन महसूल मंडलअधिकारी व मंडल निरीक्षक (कर्तव्ये व कामे) नियम, १९७०
- २१. महाराष्ट्र जमीन महसूल (मळईची जमीन व धौत जमीन) नियम, १९६७
- २२. महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल भू-मापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग) नियम, १९६९
- २३. महाराष्ट्र जमीन महसुलाच्या वसुलीबाबत नियम, १९६७
- २४. महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल अधिकार्यांची कार्यपध्दती) नियम, १९६७
- २५. महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल न्यायाधिकरण) नियम, १९६७
- २६. महाराष्ट्र जमीन महसूल (मुंबई शहर) नियम, १९६८
- २७. मुंबई शहर महसूल आकारणी नियम, १९८९
- २८. महाराष्ट्र जमीन महसूल (लाकूड तोड व लाकडाचा पुरवठा इत्यादीचे नियमन) नियम, १९७०
- २९. महाराष्ट्र जमीन महसूल (विविक्षित भूमीधशरकांचा भोगवटादार वर्ग-१ मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परवानगी देण्याबाबत) नियम, १९६८
- ३०. महाराष्ट्र जमीन महसूल (शेतजमिनीवरील महसुलाची आकारणी व जमाबंदी) नियम, १९७०
- ३१. महाराष्ट्र जमीन महसूल (सहायक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा तहसिलदार यांच्या शक्ती प्रदान करण्याकरीता अर्हता) नियम, १९६८
- ३२. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी झाडे, झाडांचे उत्पन्न, चराई व इतर नैसर्गिक उत्पादने यांची व्यवस्था) नियम, १९६९
- ३३. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१
- ३४. महाराष्ट्र जमीन महसूल (सीमा व चिन्हे) नियम, १९६९
###भाग तिसरा – संकीर्ण
या भागात तीन काही अधिनियम व एक नियमाचा समावेश आहे, ते खालील प्रमाणे.
- १. मुंबई शहर (इनामी व विशेष भू-धारणापध्दती) नाहीशा करण्याबाबत अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (सुधारणा) अधिनियम, १९६९
- २. खाण व खत्रनज मालकी हक्क नाहीसे करण्याबाबत अधिनियम, १९८५
- ३. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६
- ४. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन, नियम, १९८९
###भाग चौथा – अनुसूची
या भागात एकूण ११ अनुसूचींचा समावेश असून यात विविध नमुने व तक्ते दिले आहेत.
- अ: जिल्हाधिकाऱ्याने कलम १७ किंवा १८३ अन्वये काढावयाच्या अधिपत्राचा नमुना
- ब : कलम १९ किंवा १९१ अन्वये आवश्यक असलेल्या बंधपत्राचा नमुना
- क: कलम १२९ किंवा १३० अन्वये इमारतींच्या जागांबाबत सनदेचा नमुना
- ड : जिल्हाधिकाऱ्याने कलम २४२ अन्वये काढावयाच्या अधिपत्राचा नमुना
- इ : महसूल अधिकारी/ भू-मापन अधिकारी व त्यांचे अपील प्राधिकारी
- फ : महसुलाच्या थकबाकीच्या रकमेची मागणी करणाऱ्या नोटीसीसंबंधात कलम २६७ च्या तरतुदीन्वये द्यावयाच्या फीच्या दराचे कोष्टक
- ग : या अधिनियमाच्या कलम २७३ च्या तरतुदीन्वये द्यावयाच्या फीच्या दराचे कोष्टक
- ह : लेखान्वये असेल ते खेरीज करून अन्य रीतीने हस्तांतरण करण्यात आले असेल तेव्हा, या अधिनियमाच्या कलम २९७ अन्वये द्यावयाच्याहस्तांतरणाच्या नोटिसीचा नमुना
- आय : लेखाद्वारे हस्तांतरण करण्यात येईल तेव्हा, या अधिनियमाच्या कलम २९७ अन्वये द्यावयाच्या हस्तांतरणाच्या नोटिसीचा नमुना
- जे : अधिनियमाचे नाव व त्यातील तरतुदींच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या प्रकरणातील आदेशाविरुद्धची
- किंवा निर्णयाविरुद्धची अपिलीय किंवा पुनरीक्षणविषयक अधिकारिता
- के : सुधारण्यात आलेले अधिनियम व त्यांतील सुधारणेची व्याप्ती
-
नियम पुस्तिका / खंड
महसुली लेखांकनांचे एकत्रीकरण, महसूल कार्यालयातील कार्यपध्दती व नियम तयार करण्यासाठी शासनाने सन १९६८ मध्ये एक समिती नेमली होती. त्या समितीने ठरविलेल्या कार्यपध्दती व नियमांना खंड असे म्हणतात. या खंडांचे १ ते ५ असे ५ भाग आहेत.
खंड – १ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, शासन निर्णय व परिपत्रके यांचा समावेश आहे.
खंड – २ मध्ये जमीन महसूलाच्या विषयांवरील महसुली परिपत्रके, प्रशासनिक आदेश व शासन निर्णय यांचा समावेश आहे.
खंड – ३ मध्ये तहसिल, उपविभागीय व जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यपध्दती विषद करण्यात आलेली आहे.
खंड – ४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील तलाठी, मंडल अधिकार/मंडल निरीक्षक यांची कार्यपध्दती व कर्तव्ये विषद करण्यात आलेली आहे.
खंड – ५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील तालुका व जिल्हा पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती विषद करण्यात आलेली आहे.
भारतीय वारसा कायदा १९२५
हिंदू वारसा कायदा, १९५६
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (विशेषत: कलम १०७ ते ११०, १२९, १३०,१३२, १३३, १४४, १४५, १७४ १७६, १७४)
भारतीय दंड विधान (विशेषत: कलम १४१ ते १६०, १८८, १५३, १५३ अ, ५०५)
मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ (विशेषत: कलम ५५ ते ६३ अअ)
मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण कायदा, १९४७
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२
भारतीय नोंदणी कायदा
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८
हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५०
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश ) अधिनियम, १९५८ पैकी लागू असलेला अधिनियम
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
खाण व खनिज (विकास व नियमन) अधिनियम १९५७ (केंद्र शासनाचा कायदा)
महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन (विकास व नियमन) नियम २०१३
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
मुंबई करमणूक कर कायदा
स्थानिक स्वराज्य संस्थांबाबचे कायदे
माहितीचा अधिकार कायदा, २००५
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य/ निराधार आर्थिक दुर्बलांसाठी योजना
महाराष्ट्र नागरी सेवा (सर्व विषय)
रो.ह.यो. नियोजन व कायदे
मुंबई कारागृह पुस्तिका १९५५
तसेच इतर अनुषंगीक कायदे, नियम व शासन निर्णय आणि परीपत्रके आणि न्यायालयीन निकाल संदर्भ.