सर नमस्कार मी श्रीधर जोशी राहणार कवठे महांकाळ जिल्हा सांगली, मी सध्या राहत असलेली जागा ही 1981 रोजी प्रांतांच्या आदेशान्वये बिनशेती झालेली आहे, परंतु सदर गटाचा अद्याप पर्यंत सिटी सर्वे झालेला नसून मोजणीचा नकाशा उपलब्ध नाही, निबंधक ऑफिसमध्ये खरेदी विक्री, वाटणी पत्र तसेच इतर कामे करताना नकाशा ची गरज पडते, आणि नकाशा उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे होऊ शकत नाहीत. समजूतीचा नकाशा मिळणे कामे नगरपंचायतीला किंवा ग्रामपंचायतला अर्ज केल्यास तेही याबाबत कोणती कारवाई करत नाहीत. या बिनशेती प्लॉटची वाटणी करण्यासाठी कोणती कार्यवाही करावी याचे कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती